वाढदिवसाचे पोस्टर्स
वाढदिवसाचे पोस्टर्स
साहेब, बॉस, दादा,भाई
पालन हार, तारणहार
अशी मोठीच बिरुदावली
आणि अशा आशयाची
शहरभर पोस्टर लावली
काय तर म्हणे
वाढदिवस भाईचा
आज पर्यंत असा
झालाच नाही कोणाचा
काय तर म्हणे
एकच बॉस
आता हेच पंतप्रधान
होतील खास
काय तर म्हणे एकच
दादा
बाकी सगळ्यांचा
फुकट चा वादा
काय तर म्हणे
एकच साहेब
बाकी सगळ्यांचा
करतील हिशेब
अशा कित्येक पोस्टरने
शहराच्या सौंदर्यात भर घातली
आणि भिकाऱ्यांनी भिकाऱ्यांना
थोडीफार भीक वाटली
हेही खुश दिल्याच्या आनंदात
तेही खूश घेतल्याच्या आनंदात
सामान्य माणसाला
काहीच फरक नाही
आज हा लागला आहे
उद्या लागेल तिथे दुसरा
भाई
