उत्तर रात्रीत पहाटे...!
उत्तर रात्रीत पहाटे...!
तुझी वचने चाफा-मोगरी,
दु:खे सारी दे मला..
झळा प्राशुनी उन्हाच्या,
होईन सावली तुला...! १.
भाळुनी इथल्या काळोखी,
लक्ष-लक्ष दीप लाविले..
उत्तर रात्रीत पहाटेत मज,
तुझे भास भास झाले...! २.
हे लेणे जगणे उधारीचे,
पर्वा मरणाची कुणाला?
इथे माखल्या सुखांसी,
मात्र भाव नसे मजला...! ३.
तुझ्या स्निग्ध नयन-ज्योती,
पाहुनी ते स्नेहदी झरे झरले..
उत्तर रात्रीत पहाटेत,
तुझे भास भास झाले...! ४.
इथे पाऊल पेरले स्वार्थात,
नसे हव्यास मनी माझिया..
तुझ्या नर्गिसी डोळ्यात,
माझी अथांगली दुनिया...! ५.
दंभ सारे झुकविन इथले,
आव्हान ज्वाला प्राशिले..
उत्तर रात्रीत पहाटे,
तुझे असे भास झाले...!! ६.