STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

उठा नवतरुणांनों

उठा नवतरुणांनों

1 min
222

उठा नवतरुणांनों 

पुन्हा जागृत व्हा..... 

प्रत्येकाच्या जीवनात 

नवचैतन्य भरा!!!


आशेचा एक किरण 

मनात बाळगून,

भरकटलेल्या समाजाला 

अंधाऱ्या काळोखातून काढून,

समाज विकासाची नवी दिशा द्या. !!१!!


उठा नवतरुणांनों

पुन्हा जागृत व्हा.....


घराघरातून फिरुन सारे 

विचार आपले पटवा, 

ऐश्वर्याच्या ऐरावतीवर 

बसलेल्या समाजाला, 

पुन्हा एकदा दैन्यावस्थाची जाण द्या. !!२!! 


उठा नवतरुणांनों 

पुन्हा जागृत व्हा..... 


फांद्या फांद्या वर बसलेल्या 

पाखरांच्या थव्यात, 

नवयुगाची वीणा द्या 

नवीन राग नवीन ताल,

नव्या स्वरात सुमधुर संगीत द्या. !!३!! 


उठा नवतरुणांना 

पुन्हा जागृत व्हा.....


जननी आपली लाल झाली 

रंग तिचे उडून गेले, 

मंगलमय स्वरांनी आज 

धरती चे रूप बदलून,

आपणच आपली बाग फुलवू या. !!४!! 


उठा नवतरुणांनों 

पुन्हा जागृत व्हा.....


ज्ञांसंपदा मिळवून सारे 

एकच राग गाऊया, 

परीमल बनवून भूतलावर 

यशोगाथा चे शिखर गाठून,

एकमेकांच्या विजयाने दिग्विजय मिळवूया. !!५!! 


उठा नवतरुणांनों 

पुन्हा जागृत व्हा.....


विस्तृत होऊन विनयतेने 

सुगम संकल्प करू या, 

उच्च विचारांच्या शक्तिने

शोकीत क्षोणीला परत एकदा,

तृप्त करण्यास शितल मात्रा देऊया. !!६!! 


उठा तरुणांनों उठाच आता 

पुन्हा एकदा जागृत होऊन 

नवचैतन्याचा विहार करा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational