उत्साह शिवजयंतीचा
उत्साह शिवजयंतीचा
उत्साह असा शिवजयंतीला,
रोमारोमात का संचारीला.
सजवला असा हा छबीना,
म्हणू लागल्या त्या पाळणा.
नाव शिवरायांचे उच्चारीले,
तसे अंगात रक्त सळसळले.
झाली घोषणा त्यांच्या नावाची,
त्यांनी हाक दिली स्वातंत्र्याची.
जागं केलं साऱ्या जनतेला,
स्वातंत्र्यासाठी मावळे मदतीला.
किल्ल्या मागून किल्ले जिंकले,
अन मराठ्यांचे राज्य स्थापिले.
जयंती अशा या राजाची,
शिकवण देऊनी जाते स्वराज्याची.
ठेवा आठवण मावळ्यांच्या मर्दानीची,
आणि शिवरायांच्या पराक्रमाची.
नका करू हिंसा कोणाची,
सारी लेकरे ही ईश्वराची.
सोडा जाती धर्माचा तिढा,
करा सुरु प्रगतीचा लढा.
ऐकू आर्त हाक लेकरांची,
आणि आपल्या माय भगिनींची.
उत्साह असा शिवजयंतीला,
रोमारोमात हा संचारीला.
