उंटावरचे शहाणे
उंटावरचे शहाणे
इथे - तिथे वावरताहेत कसे उंटावरचे शहाणे ?
होवो वाटोळे कितीही शेठचेच कौतुक सोहळे
महागाई वाढो की बेरोजगारी महापूर येवो की कोरोना महामारी
तुमचं तुम्ही बघा बाबानो पण ... शेठचेच उदो उदो झाले पाहिजे
काय त्यांचं ज्ञान , किती अगाध ना कोणी उपचाराविना मेले ...
ना कोणी दुश्मन घुसले ...शेठच आमचे देव अन तारणहार
अंधभक्तांची फौज ,लुटारूंची मौज
जुमले सारे अन खोटा दुराभीमान नुसता
किडनी विकू पण मत मात्र शेठलाच
येऊन येऊन येणार कोण ,
ह्यांच्याशिवाय बेफाम गाडी ,
आत्म मुग्ध ड्रायवर अनाडी अनाकलनीय जोडी ,
लोकशाहीवर कुरघोडी फोडा आणि झोडा ,
पाहिजे तर जासूसी करून
छाताडावर नाचताहेत उंटावरचे शहाणे ...
