उमेद
उमेद
दिशाहीन वाटेवर चालून थकलेले पाय
तेव्हा पाहिली वठलेल्या वृक्षावर,
चढणारी गोगलगाय
जरा कानोसा घेतला त्याच झाडाखाली बसून,
तिथून उडणारी चिमणी
तिला म्हणाली हसून
अगं वेडे............
फळ तर सोड, झाडाला पान सुद्धा नाही
अशा झाडावर चढायची, करतेस का ग घाई?
तिला गोगलगाय म्हणते...
मी तिथे पोहचेन तेव्हा झाड फळांनी बहरलेलं असेल
आज चढायला सुरुवात करेन
तेव्हाच तर मी तिथे दिसेन
तुझ्यासारखे पंख नाहीत
म्हणुन नाही रडायचं
आशेचे पंख लाऊन
मलाही आहे उडायचं
त्या दोघींच्या संभाषणाने
खरंच किमया केली
थकलेली पावलंही पुढे
बरंच अंतर चालत गेली.
