STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

3  

Sanjay Gurav

Romance

उगीच भास होतात

उगीच भास होतात

1 min
343

नसतांनाही तू असल्याचे

मनास उगीच भास होतात

तुझे होतात तेव्हा तर ते

वेड्या अधिकच खास होतात.


दिवसा दिवास्वप्नांची गर्दी

काळीज होतसे उगा बेदर्दी

आठवते चोच अर्धी अर्धी

माझी पारध तू पक्का पारधी.


भास जे रूजतात खोलवर

धपापून ऊर होई अनावर

नाही घ्यावें जरी मी मनावर

कुठली पुरती सांग भानावर?


आवर्तने भासांची मला घेरती

आठवणींना ठरलेली मग भरती

सोडून सगळे स्वार भासावरती

तूच कर आता चांदणगणती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance