उदास मी
उदास मी
उदास मी बसली होती विचारत
खुर्चीत बसलेली
मनाची दैना काय झाली
आधार कोणाचा नाही
डोळ्यात उभे ठाकले अश्रू
पण दाखवले मी चेहऱ्यावर हसु
असं काय घडलं
पण कळलं मला ना काही
सहन नाही होत हा एकटेपणा
वाट कोणाची मी पाही
हरवून गेले सुख माझा
दुःख माझा पिच्छा ना सोडी
का गुदमरतो जीव माझा
माझा मला काळात नाही
वाट पाहता सुखाची मी
मन गेले त्यात हरावूनी
काय होतं कोण संगे
कळत मजला नाही
जवळ जे होते माझ्या
पाठ केली त्यांनी माझ्याकडे
वाटलं मला नको जीव हा
पण भावनांच्या भोवऱ्यात अडकले मी
मनाने दिला मला आधार
