उच्चार
उच्चार
मिळवायचं असेल यश,तर नसावा उदघोष उच्चार,
त्याला द्यावी कृतीची जोड,बनवावा तसा आचार
उच्चारानां द्या कृतीचं, इच्छाशक्तीचं कोंदण,
तरच बदलेल आपलं जग,करील आपणास वंदन
यशाचं दार उघडत नाही, कोणी बाहेरून,
आधी बदलावं लागतं स्वतःला,उघडावं लागतं अंतरंगातून
शब्दांना द्या अर्थगर्भ विचार,शब्द बनतात शस्त्र,
उच्चार उतरवा कृतीत,होईल ते आपल्यासाठी अस्त्र
