STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational Others

2  

Arun V Deshpande

Inspirational Others

उभारी

उभारी

1 min
14.5K


जाते हाताबाहेर कधी कधी 

परिस्थिती सारी समोरची 

दूर दूर जाती सोबतचे त्यातच 

चालत नाही डोके मग कधी कधी 

हताश होऊनी बसते एकाकी मन 

उदास होऊनी झरती डोळे 

होऊनी जातो शक्तीपात जणू 

हाता-पायात येती गोळे 

समजावी मीच माझ्या मनाला 

बरे झाले एक भ्रम तरी दूर झाला 

आता आपल्याशी कुणा ना देणे-घेणे 

असेच आता आयुष्य नि पुढचे जगणे 

निराशेने खचून जाऊ नये रे 

उभारी आपणच आपणास द्यावी 

सांगतो नेहमी कविमित्र माझा 

अशावेळी असे तोच सखा माझा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational