त्यागी रमाई...
त्यागी रमाई...


झाली बाबासाहेबांची
अर्धांगिनी शिल्पकार
माझी रमाई रमाई
ममतेचा आविष्कार...
फुलवला त्यागातून
तिने कल्याणी संसार
केला सांभाळ मुलांचा
होता एकटा आधार...
स्वतः कष्टात झिजून
उभी पतीच्या सोबत
माय दीनदुबळ्यांचा
करी उद्धार सतत...
हातभार भीमराया
शिक्षणात मदतीचा
प्रण घेऊन त्यागाचा
कायमच्या सोबतीचा...
इच्छा, आकांक्षा सोडून
झाली माता अभिमान
सदाचारी आचरण
मनी ठेवून सन्मान...
नाही संपूर्ण जीवनी
तिची कधीच माघार
सेवाभावी कल्याणाचा
सदा करून विचार...
झाली महान सोसून
किती दुःखाचे ओघळ
स्वाभिमानी मूर्ती थोर
जगी विख्यात ओळख...