STORYMIRROR

Somesh Kulkarni

Romance

3  

Somesh Kulkarni

Romance

त्याग

त्याग

1 min
28.7K


तीक्ष्ण नेत्रकटाक्षांनी घायाळ केलेले हृदय माझे कमलदलासम जपले होते,

आज त्या हृदयावर फुंकर मारताना तुला श्वास पुरेल का?

प्रेमाने हाती घेतलेले हात नकळत हातातून सुटले होते,

आजही त्या वाटेवर थांबून तुझी वाट पाहतोय,येशील का?

तुझ्या विरहाच्या दुःखात मीच माझ्या भावनांना अतोनात छळले होते,

आज त्या भावनांना आवर घालताना तुला रडू आवरेलं का?

तुझ्याशी बोलण्याची एक संधी मिळण्यासाठी मी अनेकदा मौन बाळगले होते,

आज मला काहीतरी सांगण्यासाठी तुझे शब्दभांडार उरेल का?

तुझ्या आठवणीत झुरण्यासाठी सवडीने कामे करणे टाळले होते,

आज मला भेटण्यासाठी तुला वेळ मिळेल का?

तुझे जीवन सुखी होण्यासाठी परमेश्वरास सर्वस्व अर्पिण्याचे प्रार्थिले होते,

आज माझ्या स्वार्थासाठी थोडासा त्याग करशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance