STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Romance

3  

Rohit Khamkar

Abstract Romance

तूझ्या बद्दल

तूझ्या बद्दल

1 min
205

काय बोलू कस बोलू, आणी किती ते बोलू तूझ्याबद्दल.

एवढा गोंधळ उडालाय, आता विचार करतोय माझ्याबद्दल.


तू आधीही होतीस आयुष्यात, पण नजरे आड जणू.

आता खात्रीशीर आहेस, काय काय ते तुला म्हनू.


तुला मांडायची ताकद, आजही लेखनी आणी बुद्धी ला त्रास देते.

आधी कितीही सुंदर लिहिलं, की नंतर भन्नाट कल्पना येते.


जाणून आहे मी तुला, ओळखतोय तो संपूर्ण पूरा.

कितीही लपवलस सगळं, तरी चेहरा दिसतो खरा.


खुप काही बदललय, अजूनही बदलेल खुप काही.

दिवसभर सैरभैर मन, सायंकाळी तुझी वाट पाही.


तूझ्या येण्याने जिवनात, नशिबाला झाली अद्दल.

परत तेच काय आणी किती लिहू, ते तूझ्या बद्दल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract