तूच तुझा शिल्पकार
तूच तुझा शिल्पकार
चाल गड्या चाल नको शोधूस सहारा
पक्षांनाही असतो का कुठे आकाशात निवारा
नित्य नियमे प्रयत्न करावे
पाऊल पाऊल टाकत जावे
तुझ्याही मेहनतीला येईल निखारा
पक्षांनाही असतो का कुठे आकाशत निवारा
घे मशाल हाती पेटून उठ
सर्व काही असेल चांगले
तु प्रयत्न तर करून बघ
तूच बदलशील तुझाच किनारा
पक्षांनाही असतो का कुठे आकाशात निवारा