तू
तू
तू होतीस तेव्हा पण, सर्व काही होते.
तू नाहीस तेव्हा पण, सर्व काही आहे .
तू गेलीस म्हणून, थोडा एकटा पडलो.
कदाचित आयुष्याशी, पुन्हा एकदा जोडलो.
कधी तुझी आठवण येते, कधी मी काढतो.
पिकलेला आंबा ही, झाडावर सड्तो.
दिवस नेहमीसारखा जातो, रात्र सरता सरत नाही.
त्रास कधी कमी ज्यास्त होतो, फक्त काळोख विरत नाही .
