तू
तू


घेऊनी सरणावरती निघाले मला
ठाऊक कसे मरण मिळाले मला
नयनांनी आधी हेरलेस जाळ्यात
कयास मनीचे न ऊमजले मला
कंकणाने केलास मधूर ईशारा
टाकलास पाश न समजले मला
हातावरली मेहंदीचा रंग गहीरा
केशचाफ्यानेच बेहोश केले मला
अत्तराचा फाया धुंधीत ठेवी एवढा
प्याल्यातूनी काय तू पाजले मला
मिठीत भरलास मी वजा हा देह
मध्यविषाने आधीच नेले मला
घाबरून तू टाकलास देह एकटा
चुंबनाचे व्रण तेवढे राहीले मलास
बेहोश बेवारस घटीका मोजताना
पुरावे पूसलेस ईतूके कळले मला
माग काढायचा तो व्रण राहीलेला
पावसाने तेंव्हा खोटे ठरवले मला
चार खांदे वाहतात तूझेच पाप
तरीही नाव नाहीच कळले मला
चेतन रोज गझलांत शोधतो आहे
स्पर्श शेवटचे ते केलेले मला