तू वात मी दिवा
तू वात मी दिवा
तू वात हो मी दिवा होईन
दुःख तुझे सारे माझ्या ओंजळीत झेलीन
तू तेवती ज्योत हो मी कवडसा होईन
निरंतर प्रकाशास तुझ्या आधार मी होईन
तुझ्या-माझ्या साथीने करू अंधारावर मात, शोधू नवी प्रकाशवाट
माझ्यासाठी तू तुझ्यासाठी मी एकमेकांसाठी राहू सदैव उजळत

