तू समोर येताच
तू समोर येताच
तुझ्या सावलीमागची माझी पाउल
दुसऱ्या दिशांना वळतच नाहीत
तुजी नजर भिडता मनात उठते काहूर
येतो प्रीतीचा पूर कसा,कळतच नाही
तू समोर येत जग होते धूसर
जसा जगाचा विसर
कोणी दिसतच नाही
टपोऱ्या डोळ्यांनी देतेस होकार की नकार
ह्या प्रश्नांचे उत्तर
मज सुचतच नाही
एकांतात माझ्या
तुझ्या ओठांशिवाय काही आठवतच नाही
नयन माझे झाले तुझे गुलाम
तुझ्या रूपाशिवाय डोळ्यात काही साठवतच नाही
बनूनि मेघ अंबराचे कोसळतेस थेंबा थेंबातून
श्रावणाचे हे उधाण मन पहातच नाही
तू समोर येत बरसतेस ऋतू होऊन
रोमांचली ही काया
माझी राहतच नाही

