तू परी या भूवरी
तू परी या भूवरी


तू परी या भूवरी मुक्त तू हो व्यक्त तू
तुझ्या जल्लोषाचे पडसाद उठू दे कणाकणात,
तू आहे झंजावात.
वाट नको पाहू कोणी ऐकण्याची,
तुझ्या भावनांची होऊ दे मुक्त अभिव्यक्ती.
देऊन कधीच न रिता होणारा तू अखंड नदीचा पाट
तू तुझ्या संवेदनांना दे वाट.
तुझ्या भावनांचे प्रतिबिंब उठू दे काव्यात,
तुझ्याही अपेक्षांचे साखळदंड नको तुझ्या पायात
पंखांना तुझ्या बळ आहे अचाट.
नवजीवन पल्लवी तुझ्या कणाकणात,
निसर्गाचीच तुला आहे की वेळीही साथ.