श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ


ती तीक्ष्ण नजर, चाणाक्ष बुद्धी, पूर्ण वाहिले अध्यात्मि.
परमात्म्याशी एकात्म साधती, आशी ही दिव्या गुरुमुर्ती.
सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता जिथे ,अशा स्वामींचे भक्त आम्ही दाखवू सचोटी.
गुरुराया निश्चित जाणवते तुझी मातृत्व वृत्ती, सृष्टीच्या कणाकणातून तुझे प्रेम अवृत्ती.
देशी आमच्या चुकीला चाप आणि भक्तीला प्रेमाची थाप.
शरीर हे नश्वर जरी, त्यातुनी मोक्षाचा मार्ग परी.
आहार विहार विचारे ते सुदृढी,साधण्या समरसता ईश्वराप्रती.
दया आम्हा कार्य सिद्धि आणि विवंचना रहित वृत्ती. जागृक बुद्धी आणि धीर चित्ति.
ओठी तुमचे नाम रमो, चित्ती तुमचे ध्यान वसो.
मनी असो हनुमंता समान भक्ती मिळो आराध्याच्या कार्यास सिद्धी.
क्षण हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा, घालतो त्रिवार मुजरा तुम्हाला मानाचा .