शिखराची वाट
शिखराची वाट

1 min

1.1K
भिती काय जगण्याची ती माहीतच नव्हती,
आत्ता वाटे तेव्हाच मी खरी जगली होती.
अजाणतेपणातले ते माझे प्रयत्न,
तिच खरी माझि शक्तति होती.
पुन्हा वाटे जगावे आजमध्ये,
तरी खुलावे शून्यातून पुन्हा पुन्हा.
खुजा अनुभवांचे पटलं पुसावे,
प्रयत्नांचे ते मखर चढवावे.
फक्त आता आतून ना झुरता, प्रयत्नरूपी उरावे.
यश्याच्या शंकेत जगताना ही मजा
आत्मविश्वास हा प्रयत्नांचा कवेत जो असा.
वाटे तो स्वप्नांचा घाट घालुनी,
पुन्हां पकडावी शिखराची वाट.