Snehal Gapchup

Others

4.0  

Snehal Gapchup

Others

आईचा अंबाडा

आईचा अंबाडा

1 min
1.1K


अजूनही आठवतो आईचा तो भारगच अंबाडा,

साऱ्या प्रश्नांना गांठ मारुनी थोपवून धरणारा.

पदर सदा खोचलेला तिचा तो, सर्व पुरुषार्थांना लाजवणारा.

आमचे तुरु तुरु धावणे तिचा वेग साधाया,

आणी अंत्तर पुन्हा पाळणे तिला गाठाया.

तिचे कधीच थकून न बसने,माझ्या आश्चर्याच्या परिसीमा गाठाणे.

ऐकती असो वा सर्वांमध्ये, ती मला सदा तशीच स्थिर भासते.

डॉक्टर वरची ती तिची दादागिरी, मला हसूच ना आवरी.

अजूनही आमची कुशग्र बुद्धी, काय कुठे ठेवले हे तिलाच पुसती.


Rate this content
Log in