माझी सखी
माझी सखी
ती गेली दूर तेव्हा मी एकटीच बावरली,
सर्वत्र शोधले परी नाही ती गवसली.
होते लुकलुकते तारे नाभि,
पण पूनम रात्रीचीं ना होती ती चंद्रकला सोबती.
आसमंतआस ही ठावे आमचे नाते,
म्हणूनच ते पुन्हा पुन्हा भेटावे.
ती आणि भिन्न भिन्न जरी,
मने जुळूनी आल्यावर काय ते दूरी.
मी आणि माझी सखी मुक्त यार आकाशी
नभ हे आमचे स्वयं प्रकाशी.