औंधवसिनि जगदंबे
औंधवसिनि जगदंबे


औंधवसिनि जगदंबे जगात जननी माते,
आदिमयें नमन कुलदेवी तुझ चरणी यमाई माझे.
अतिरम्य दंडकारण्य पिनाकपाणीची आज्ञा घेऊनी,
त्वा पुरुषोत्तमाशी परीक्षीयले हे आई भावानी.
पाहुनी सीता रुपे दुख करता पूर्वा जन्मीची ही माता,
'ये माई' असे प्रभुरामे तुझं संबोधिले.
अतिव दुःखे करूनी ,पुन्हा त्वा परीक्षिता,
'तु काई' अशी अलीस असे रघुतामे तूझ पुसले.
प्रसन्ना होवून दिव्य विजयाचा आशीर्वाद
त्वा रघुरायाशी दिधला गा आई.
सवे घेऊनी ज्योतिबा,कालभैरवी,कालिका आणी महालक्ष्मी सवे,
दारून युद्धे ओंधासुराशी हरवूनी धर्म त्वा स्थापीयला माई.
माते तव करुण हृदये ओंधासुराशी अमरात्व दिधले.
शौर्ये घणाघोर युद्ध जिकून मुक्त केशे तीर्थ स्नान तु केले.
तेथे तुझे मोकळाइ रूप अवतारीयेले.
त्र्यैम्बक भक्ती पाई सहोदारी रूपे,
तु दर्शन देऊनी त्याचे आनंदवन खुलविले.
किन्हाईला जेथे गाळ पान्हायली,
त्या साखरगडी भक्तवसले तु स्वयंभू प्रकटली.
तवचरणी ठेवूनी माथा हे लेकरू धन्य झाले.