तू ब्रम्हकमळ
तू ब्रम्हकमळ
तू पैलतीरीच ब्रम्हकमळ
मी ऐलतीरीचा मनकेवडा
भेटीस तुझ्या तळमळ
तू नेहमीच मोहरणारी रातराणी
मी तुला बिलगलेला प्राजक्त
सोबत गाऊ प्रीतगाणी
तू उन्हात चमकणारी सदाफुली
मी तुझा लालबुंद गुलमोहर
ओंजळ प्रीतफुलांची वाहिली
