STORYMIRROR

Amardip Kolhapure

Romance

3  

Amardip Kolhapure

Romance

चिंब पाऊस

चिंब पाऊस

1 min
362


हिरव्या गार शिवारात,

रानाच्या बांधावरी,

आज चिंब चिंब करी,

पाऊसाच्या सरी...


पाखरांचा किलबिलाट,

हर्ष तना मनात भरी,

रातकीड्यांचा सुरुनाद,

काजव्यांचा लख लख प्रकाश,

चमके गवताचा पात्यावरी,


नक्षत्रांचा खेळ मृगात मेळ भरी,

वसुंधरेस लाजवी हरित कांती,

वाऱ्यांचा खेळ भारी, नभापरी,

आज चिंब चिंब करी,

पावसाच्या सरी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance