STORYMIRROR

Amardip Kolhapure

Romance

3  

Amardip Kolhapure

Romance

स्मृतीत गंधाळलेला पाऊस

स्मृतीत गंधाळलेला पाऊस

1 min
200

मंद प्रकाश सप्तरंग खेळ इंद्रधनुष्यात,

कोणत्या रंगात तुझ्या गुंतलो मी,


सुगंध केतकीचा पसरला रानोमाळात,

कसल्या गंधात तुझ्या मोहरलो मी,


भास किती आठवणीतले मृगजळात,

सोडवण्या मृगवादळात गुंतलो मी,


पावसाच्या आधीच आज स्मृतीत,

मातीच्या गंधात दरवळलो मी,


अन् ढग मनात डोकावतांना,

एका थेंबात चिंब झालो मी,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance