गंध स्मृतींचा पाऊस
गंध स्मृतींचा पाऊस
1 min
150
मंदप्रकाश सप्तरंगी खेळ इंद्रधनुष्यात,
कोणत्या रंगात तुझ्या गुंतलो मी,
सुगंध केतकीचा पसरला रानोमाळात,
कसल्या गंधात तुझ्या मोहोरलो मी,
भास किती आठवणीतले मृगजळात,
सोडवण्या मृगवादळात गुंतलो मी,
पाऊसाच्या आधीच आज स्मृतीत,
मातीच्या गंधात दरवळलो मी,
अन ढग मनात डोकावतांना,
एका थेंबात चिंब झालो मी,
एका थेंबात चिंब झालो मी...
