गंध स्मृतींचा पाऊस
गंध स्मृतींचा पाऊस
पाऊसाच्या आधीच स्मृतीत,
मातीच्या गंधात दरवळलो मी,
ढग मनात डोकावतांना,
एका थेंबात चिंब झालो मी,
मंदप्रकाश खेळ इंद्रधनुष्यात,
कोणत्या रंगावर तुझा भाळलो मी,
गंध मधुर रानोमाळात केतकीचा,
कोणत्या गंधात तुझ्या दरवळलो मी,
भास किती आठवणींतले मृगजळी,
सोडवण्या मृगवादळात गुंतलो मी....
अन ढग मनात डोकावतांना
एका थेंबात चिंब झालो मी....

