बस स्टॉप
बस स्टॉप
तुझी वाट पाहताना,
विचार मग्न होताना,
आजूबाजूच्या मित्रांना,
त्त्यांच्या बोलवणाऱ्या हाकेला,
किंचित प्रतिसाद देत असताना,
बरंच काही घडून जात,
समोरचा एका पेसेंजर साठी वाट
पाहणारा तो ऍटोवला,
आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची
वाट पाहणारे लोक,
एक वेळच कोणतरी खायला देईल का? असं वाट
पाहणारा तो वृद्ध भिकारी,
असे कित्येकजण कशाची तरी, कोणाची तरी
वाट पाहत असतात,
ह्या सगळ्यांची धांदल आणि माझी सुद्धा,
पण त्यांची तुलना मी माझ्याशी केली, अन
जरी रात्रभर वाट पाहणाऱ्या मनाच्या
आतुरलेल्या कळ्या फुलण्या आधीच
कोमेजल्या असल्या तरी,
माझ्या प्रेमाचं सत्व अजून वाढत जातं कारण
सरतेशेवटी एकच इच्छा उरते बघ की
ह्या सर्वांची इच्छा पूर्ण होन्याची
मात्र तू येत नाहीस.....
