STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy

3  

yuvaraj jagtap

Tragedy

तुलाच पाहिले मी (कविता)

तुलाच पाहिले मी (कविता)

1 min
665


तुलाच पाहिले मी


आई म्हणून जन्म देताना

तुलाच पाहिले मी

मुलगी आहे म्हणून कळी खुडताना

तुलाच पाहिले मी


मर्दानी होऊन लढताना

तुलाच पाहिले मी

असह्य अबला नारी होताना

तुलाच पाहिले मी


नऊ महिने कळा सोसताना

तुलाच पाहिले मी

पोटचा गोळा फेकतानाही

तुलाच पाहिले मी


सहनशील सून बनताना

तुलाच पाहिले मी

सासू बनून सुनेला त्रास देताना

तुलाच पाहिले मी


पतिव्रता होऊन शील जपताना

तुलाच पाहिले मी

वेश्यालयात देह विकताना

तुलाच पाहिले मी


नजर नाकासमोर ठेवून चालताना

तुलाच पाहिले मी

वैवाहिक जीवनात पाय घसरताना

तुलाच पाहिले मी


अन्यायाविरुद्ध लढताना

तुलाच पाहिले मी

तू स्वतः जळून राख होताना

तुलाच पाहिले मी


यश शिखरी भरारी घेताना

तुलाच पाहिले मी

अपयशाने खचून जाताना

तुलाच पाहिले मी


हाती पुस्तके घेऊन वाचताना

तुलाच पाहिले मी

लोकांसमोर बीभत्स नाचताना

तुलाच पाहिले मी


पदराखाली लाज झाकताना

तुलाच पाहिले मी

लाज वेशीवर टांगताना

तुलाच पाहिले मी


लेकराला प्रेमाने वाढवताना

तुलाच पाहिले मी

त्याचेच कुऱ्हाडीने तुकडे करताना

तुलाच पाहिले मी


एकसंघ कुटुंब सावरताना

तुलाच पाहिले मी

घटस्फोटाने कुटुंब उध्वस्त करताना

तुलाच पाहिले मी


पिलांच्या पंखात बळ देताना

तुलाच पाहिले मी

पतीच्या मागे सती जाताना

तुलाच पाहिले मी


नवऱ्या मागे विधवा होताना

तुलाच पाहिले मी

शरीर भावनाही जाळताना

तुलाच पाहिले मी


प्रेमसागरात पोहताना

तुलाच पाहिले मी

विरह,वेदना आगीत होरपळताना

तुलाच पाहिले मी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy