STORYMIRROR

SANJAY SALVI

Tragedy

3  

SANJAY SALVI

Tragedy

तुला आठविता ...

तुला आठविता ...

1 min
12.5K


तुला आठविता मी अमृते नाहलो,

तुला विसरिता मदिरेत मी बुडालो,

एक एक क्षण भासे,

एक एक युग जसा,


क्षणो क्षणी मज वाटे,

का तुझा भास असा,

सर्व दिशा भरून हा,

तिमिर असा का दाटला,


सरलेल्या वाटेवर,

उरलो मी एकटा,

वळूनी मागे पाहता,

दिसती मज पाउल खुणा,


वाटते उगवशील तू,

त्यातुनी एकदा पुन्हा,

अजूनही वाट पाहतो,

अजून तुला आठवितो,


येशील तू कधीतरी,

रित्या प्याल्याला सांगतो,

येशील तू कधीतरी,

रित्या प्याल्याला सांगतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy