Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Inspirational

4  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज

1 min
386

माणिक बंडोजी इंगळे यांना , 

राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते । 

अंधश्रध्दा , जातीभेद निर्मुलनासाठी , 

यांच्या भजनांचा वापर होते ॥ 

आत्म संयमाचे विचार त्यांनी , 

ग्रामगीता या काव्यातून मांडले । 

खंजिरी भजन या प्रकारांनी , 

प्रबोधनाचे वैशिष्ठय ठरले ॥ 

आधुनिक काळातील महान संत , 

आडकोजी महाराज त्यांचे गुरु । 

गुरुंनी तुकडोजी नाव बदलून , 

केले समाजकार्य व देशसेवा सुरु ॥ 

देशभर हिंडून राष्ट्रीय एकात्मतेचे , 

महाराजांनी प्रबोधन केले । 

जपान मध्ये जाऊन सर्वाना , 

विश्व बंधुत्वाचे संदेश दिले ।।

ग्रामविकास म्हणजे देशाचा विकास , 

लक्षात घेऊन ग्रामगीता लिहीली । 

ग्रामोन्नती व ग्रामकल्यानासाठी , 

ग्रामगीता ग्रामनाथाला अर्पण केली ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational