STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Romance

3  

Urmi Hemashree Gharat

Romance

तुझ्यासवे

तुझ्यासवे

1 min
772


धुंद अवखळ चांदराती

मनविलास हसतसे सुंदर

धुक्याच्या मऊ अंथरुणातुनी

स्वप्नसखा काहीसा दिसे धुसर


पडता कस्तुरी स्पर्शिका

दवबिंदुच्या सोन सरींवर

उधळी रेशमी क्षणिका

पहाट मोहरुन स्वप्नांवर


स्पर्शिली अलवार वीणा

मनाच्या कोऱ्या कागदावर

आलाप स्वरांचा दिवाना

विसावला जीवन वळणावर


रंग तु़झ्या आठवाचे

रंगले मेंहदीच्या पानावर

क्षण प्रीतीचे सुरंगी

खुलले स्वप्नांच्या झुल्यावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance