तुझ्यासाठीच
तुझ्यासाठीच


तू नसतानाही तुझ्यासाठीच
स्वप्न पूर्ण करतोय मी
तुझ्या विरहाच्या दुःखाशी
मनात निःशब्द लढतोय मी ||0||
तू येशील तेंव्हा तुझ्यासाठी
एक जग थाटलेलं असेल
हृदय चिरून दाखवेन तुला
तुझंच प्रेम दाटलेलं असेल
असं मुळीच समजू नकोस
तुझ्याविना हरतोय मी
तुझ्या विरहाच्या दुःखाशी
मनात निःशब्द लढतोय मी ||1||
तुझ्यासाठी आयुष्याला
कलाटणी देत आहे मी
साचा बदलून हृदयाला नवी
धाटणी देत आहे मी
उत्कर्षाचं शिखर नवं
तुझ्यासाठी चढतोय मी
तुझ्या विरहाच्या दुःखाशी
मनात निःशब्द लढतोय मी ||2||
स्वप्नं पाहिली तुझ्यासाठी
पू
र्ण ती करणार मी
सुख साऱ्या जगाचं ओंजळीत
तूझ्या भरणार मी
उध्वस्त होणार नाही गं
तुझ्यासाठी घडतोय मी
तुझ्या विरहाच्या दुःखाशी
मनात निःशब्द लढतोय मी ||3||
बर्बाद मला करेल असं
तुझं प्रेम क्रूर नाही
वळून तू बघणार नाहीस
इतकी तू मग्रूर नाहीस
अभावाने तूझ्या सखे
मनात तडफडतोय मी
तुझ्या विरहाच्या दुःखाशी
मनात निःशब्द लढतोय मी ||4||
तुझ्याविना माझं जग
खरंच सखे अधुरं आहे
सुख सारं जगातलं
तुझ्याविना अपुरं आहे
फुलं माझ्या प्रेमाची
बघ तुझ्यावर उधळतोय मी
तुझ्या विरहाच्या दुःखाशी
मनात निःशब्द लढतोय मी ||5||