तुझ्यासाठी
तुझ्यासाठी
का रे दुरावा???
प्रश्न मनास हा विचारतो
उत्तरा दाखल मग,
निर्णयास मी गाठतो....१
तुझ्या पुढील सुखासाठी
मी तुला आता दुःख देतो
भावी अपुल्या विश्वापासून
मुद्दामचं तुला दूर दूर नेतो...२
तू म्हणतेस मला निष्ठूर
ते ही मी हसण्यावारी घेतो
गुरफटून जाऊ नये तू माझ्यात
म्हणून मी हे सारे करतो...३
जाणीवांच्या वेढ्यातून
मी कसाबसा बाहेर पडतो
गुंतवून मन अन्य ठिकाणी
तुझ्या समोर अपराधी ठरतो...४
निसटूनही जाता येईलना
असा अविचार कधी न शिवतो
द्विधा मनस्थितीला सांभाळून
मुक्त हसण्याचे सोंग पांघरतो...५
तुझ्यासाठीचं तुझ्याकडे
उगाच जगाचे लक्ष वेधतो
उंचीवर तुला पाठवतांना
संवादाचे दोर मी कापतो...६
