तुझ्यासाठी
तुझ्यासाठी
धडधड हृदयाची होते तुझ्यासाठी
तडफड जीवाची होते तुझ्यासाठी
काय होतं ते नक्की कसं सांगू
फडफड जीवाची होते तुझ्यासाठी || 0 ||
कोसळतंय काहीतरी
हृदयात तुझ्यासाठी
आवळल्या जात आहेत
प्रेमाच्या गाठी
नियंत्रण सुटलंय या हृदयावरचं
पडझड जीवाची होतेय तुझ्यासाठी
धडधड हृदयाची होते तुझ्यासाठी
तडफड जीवाची होते तुझ्यासाठी || 1 ||