तुझ्याकडे मन ओढलं गेलं
तुझ्याकडे मन ओढलं गेलं
तो एक क्षण होता
तुझ्याकडे मन ओढलं गेलं
साऱ्या दुनियेशी का
क्षणात नातं तोडलं गेलं ||0||
वाटतं या जगात
फक्त दोघांचच राज्य असावं
तूझ्या माझ्या अवती
भवती दूर दूर कोणी नसावं
विसरून सारी बंधनं
तुझ्याशी मन जोडलं गेलं
साऱ्या दुनियेशी का
क्षणात नातं तोडलं गेलं ||1||
प्रेमात मन स्वार्थी झालं
तूच माझ्या श्वासात
तूच सामावतेस हृदयी
तूच माझ्या ध्यासात
मनावरचं इतरांचं
अधिराज्य खोडलं गेलं
साऱ्या दुनियेशी का
क्षणात नातं तोडलं गेलं ||2||
तुला शोधते नजर माझी
इतर काही दिसत नाही
सौंदर्यात निसर्गाच्या
मन माझे तुलाच पाही
फुलपाखरू मनाचं
प्रेमविश्वात सोडलं गेलं
साऱ्या दुनियेशी का
क्षणात नातं तोडलं गेलं ||3||
