तुझ्या माझ्या भेटीत...
तुझ्या माझ्या भेटीत...
तुझ्या माझ्या भेटीत . ,
एक एक तारा निखळत गेला,
दिवसागणिक दिवस भेटता ,
धागा धागा जुळत गेला ...
पहिल्यांदा पाहता तुला ,
कसा बाण नजरेचा सोडला,
तुला कळले कसे नाही ,
तिर आरपार मनाला चिरत गेला ...
भिरभीर शोधते नजर तुलाच ,
आता गर्दितही केव्हाची,
तु दिसता आढेवेढे नजरेचे,
तु फिरता तुझा पत्ता मागत गेला ...
खुप साहले मी चटके विरहाचे ,
एकटीने तुझ्या प्रेमात,
तुझ्याशी बोलने बोलून लाजणे,
क्षण तो आठवत रमत गेला...
हौस मला त्या क्षितीजावर ,
रेंगाळणाऱ्या लाल केशरी सांजेची,
अन् तु त्याच सांजेला ,
तुझ्या माझ्या समवेत खिळवत गेला...
आता एक दिवस तुझ्याविणा म्हणजे,
जणु युग वाटायला लागले,
हा त्रास मलाच का ? तुलाही ,
रात्रीचा चंद्र स्वप्नात विरघळत गेला...
.

