तुझे माझे
तुझे माझे
तुझे मला
माझे तुला
म्हणत असे
लहान असतांना!
मोठे झाले
विसरले लहानपण
भांडणे सदा
तुझ्या माझ्यावरून!
आईबाबा वैतागले
त्यांच्या भांडणाने
तुझे माझे
नको आता!
सुखात राहातो
आता आम्ही
तुमच्या विना
आमच्याच घरात!
हवे तसे
खुशाल रहा
तुमच्याच मर्जीने
आमच्या विना!
