तुझा भास...
तुझा भास...
आज मन खूप आहे उदास...
तरी का जाणवतो आहे तुझा भास.
डोळ्यांना ही ठाऊक की तू नाही आसपास...
तरी का जाणवतो आहे तुझा भास.
तुझे नाव घेताच दीर्घ होई श्वास...
तरी का जाणवतो आहे तुझा भास.
तुझ्या आठवणींचा प्रत्येक क्षण वाटे खास..
तरी का जाणवतो आहे तुझा भास.
का वाटतो हवाहवासा तुझा सहवास...
तरी का जाणवतो आहे तुझा भास.
तुझी माझी भेट होणेे खोटी ही आस...
तरी का जाणवतो आहे तुझा भास.

