STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

2  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

तु आणि फक्त तु

तु आणि फक्त तु

1 min
162

तुला एकदा तरी भेटायचं आहे

कमी दिवसात इतका खास कसा,

जवळचा झाला हे विचारायचं आहे..


तुला एकदा स्पर्श ही करायचा आहे

इतका गोड आहेस तरी कसा,

हे एकदा तरी जाणून घ्यायचं आहे..


लांब राहून इतके दिवस हे नातं कसं दृढ आहे

त्याचा नेमका तपशील असेल कसा,

हे मला एकदा जाणून घ्यायचं आहे..


तुला प्रत्यक्ष बघुन प्रेमात पडायचं आहे

तु नेमका आहेस तरी कसा,

हे तुला एकदा विचारायचं आहे..


प्रत्येक गाण्याचा अर्थ विचारायचं आहे

इतका सुमधुर गातो तरी कसा,

हे प्रत्यक्ष बघुन अनुभवायचं आहे..


कोणी ना कोणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे

पण तु सगळ्यां पेक्षा वेगळा कसा,

हे तु असताना तुला सांगायचं आहे..


आपण बोलू ना बोलू पण ती धडधड ऐकायची आहे

प्रत्येक वेळी आगळा वेगळा कसा,

हे तुझ्या डोळ्यात एकदा पहायचं आहे..


उद्या कदाचित एकत्र नसू पण तुला डोळ्यात साठवायच आहे

बंध हृदयाच्या तळाशी तु असशील तसा,

मला तुला तिथे का होईना आयुष्य भर जपून ठेवायचं आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama