STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

ठरवले मनात काही

ठरवले मनात काही

1 min
236

ठरवले मनात काही

दैव भलतेच प्रवाही

बांधले जे आडाखे मी

तसे मात्र घडलेच नाही.


मी योजावे अक्षर काही

नियतीने खोडावे लवलाही

नाट्य कोणते प्रवेश कुठला

पुढल्या अंकाची खबर नाही.


स्वप्न पाहणे चुकत नाही

भले आयुष्य करो काही

जग धावते स्वप्नासाठीच

घडणे बिघडणे "तो" पाही.


मनाचा वारू थांबत नाही

द्या मनाला पक्की ग्वाही

असेल दैवात जरी काहीबाही

मी ठरवायचे थांबणार नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational