टायगर
टायगर
करड्या करड्या रंगाची
माझी सुंदर मनीमाऊ,
टायगर आहे जी चे नाव
करते सारखी म्याऊ म्याऊ!!१!!
आळस अंगात भरलेला
दिवसभर सारखं झोपेत,
खाऊ दिले जर खाण्यास
मिटक्या मारीत खाते मजेत!!२!!
घाणीचा तिला तिटकारा
स्वच्छता बाई भारीच आवडे,
इथे तिथे कुठेही ना बसे
तिच्याच जागेवर लोळत पडे!!३!!
आले बाहेरून कोणी जरी
तर पायात येऊन घुटमळे,
जरा केले दुर्लक्षित तिला
तर घरातून सैरावैरा पळे!!४!!
अशी माझी टायगर माऊ
माझ्या शिवाय राहत नाही,
कुठेही मी असो वा दिसो
दुरून बारीक डोळ्याने पाही!!५!!
कुटुंबाचा अनमोल सदस्य ती
आवड-निवड जपावी लागते,
मूड जरासा कधी बदलला
तर सर्वांना ती धडा शिकवते!!६!!
