त्रिपुरारी पौर्णिमा...!
त्रिपुरारी पौर्णिमा...!
आठवले सखे मज
रूप तुझे देखणे
चंद्रासही तेंव्हा
भाग पडले लाजणे
पौर्णिमा ती होती
हुरहूर लावणारी
स्पर्शात सारे काही
जाणवून देणारी
आजही सखे आठवते
तुझ्या चेहऱ्यावरचे चांदणे
हस्यातून खुळणार
ते होकाराचे मधुर बोलणे
भाळलो मीही तुझ्यासवे
घेऊनी नयनी आसवे
त्या आसवात भिजूनी
सांग त्या कातरवेळी तू का रुसावे
बिलगते बाहू पाश
विलगुनी मुक्त झाले
नशीबच ते आपले
कायमचे सक्त होउनी गेले
तो चंद्रही आता
खाण्यास उरावरी बसतो
आठवांनी पुन्हा पुन्हा
डंख अंतरास गे मारतो....!

