STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

तर हे घरकुल झाले असते सुंदर

तर हे घरकुल झाले असते सुंदर

1 min
373

जर का असता माझ्या करात तुझा कर

तर हे घरकुल झाले असते सुंदर

सोनुली गोडुली आपली बाहुली

तुझीच दुसरी प्रतिमा सुंदर

तर हे घरकुल झाले असते सुंदर


पण तुजला नाही नांंदावयाचे

सोडून घरकुलं हे तुला जावयाचे

मागितलास काडीमोड

दिला तुजसी तो ठेवून

छातीवर दगड

तुझ्यापायी एक विनंती सादर

तर हे घरकुल झाले असते सुंदर


आजवरी तुझे सारे हट्ट

पूरवित मी आलो

त्यातीलच हा एक

असे मी समजलो

आता दिली सारी मोकळीक तुला

मागणे एक नको नेऊ सोनुलीला

त्यासाठी पसरतो तुझं पुढे पदर

तर हे घरकुल झाले असते सुंदर


तुझ्यासाठी उघडी सदैव

माझ्या घराची कवाडे

परतून येण्यासाठी

नको धरू मनी कोडे

एक पाखरू घायाळ

वाट पाहते तुझी वेडे

परंतु तुला आहे

माझ्या प्रेमाचे वावडे

येशील जर परतोनी

देईन तुजला तोच आदर

तर हे घरकुल होईल सुंदर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational