तो फक्त बाप असतो
तो फक्त बाप असतो


परिवाराचं पोषण करतो,
नेहमी धडपड करतो।
जीवाचे रान करतो,
तो फक्त बाप असतो॥
आपल्या मुलांसाठी,
कधी कमी न करतो।
स्वतः दुःख झेलतो,
मुलांना सुखी करतो॥
मुलांच्या शिक्षणासाठी,
नेहमी झटतो।
शेती पिकविण्यासाठी,
सतत कष्ट करतो॥
स्वतः तुटतो पण,
मुलांना खुशी देतो।
रात्रं-दिवस मेहनत करतो,
तो फक्त बाप असतो॥
कशीही स्थिती असली तरी,
हिंमतीने परिवार सांभाळतो।
रणरणत्या उन्हामध्ये,
शेतीचे काम करतो॥
मुलांचे जीवन स्थिर करतो,
मुलांच्या जीवनाचा धागा असतो।
लेकरांना नेहमी धीर देतो,
तो फक्त बाप असतो॥