STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

तो पहिला हृदयस्पर्श...

तो पहिला हृदयस्पर्श...

1 min
2

तो पहिला हृदयस्पर्श ,

डोळ्यांच्या खोल डोहात,

तु अनाहूत उडी मारली ,

सुमधूर काठ विसावला पापण्यात...

तु तिथेच तरंगत राहीला ,

ओलाचिंब तुझ्या नकळत ,

तु कोरडाच काठावर ,

अन् मी राहिले तुला भिजवत ...

तरंग उठले वलयाकिंत झाले,

मी सांभाळले भास तुझ्या नादात,

तुला मात्र तिळमात्र ना शंका ,

कुणी वेडावले तुझ्या वेडात ...

मीही सांगायचा प्रयत्न ना केला ,

जे दडलेले होते ओठात ,

पण मी भिजत राहिले ,

तुझ्या रेशमी सहवासात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract