तो जगी सुंदर...
तो जगी सुंदर...
ध्यान हे सुंदर,
मनही सुंदर ,
तो जगी सुंदर ,
त्यांने व्यापले अंतर,
धरती आकाशाचे ...
तो विठ्ठल ओळखावा,
भक्तांच्या भक्तीत दंग ,
विसरला स्वतःचा रंग,
करुणेने भरलेले त्याचे अंतरंग...
पाहता त्यासी ,
फुलून येई बाग ,
फिकी प्रभा तारकांची,
चंद्र अवतरला का? सांग...
मना सज्जना संत,
इथे तु स्तब्ध,
पावला पावलांवर अंत,
करूणाकर सागर...
मनी नाही काही,
वाहत पाणी वाहत जाई,
मनाची सुंदरता तुझ्या,
जगण्याची उद्धार होई...
ध्यान हे सुंदर,
मनही सुंदर ,
तो जगी सुंदर ,
त्याने व्यापले अंतर,
धरती आकाशाचे ...
