तो एक बाप
तो एक बाप
इवलस पाउल करंगळीच्या स्पर्शाने
पावलावर पाऊल टाकत तेव्हा
चेहऱ्यावर स्मित खुलणारा
तो एक बाप असतो
शाळेची पाटी गिरवताना
अ आईचा शब्द उमटतो
त्या शब्दांना आकार देणारा
तो एक बाप असतो
पोटाला चिमटा देवून
आयुष्याची राखरांगोळी करणारा
पण मनाला दिलासा देणारा
तो एक बाप असतो
स्वप्न भविष्याची पाहणारा
अपयशाने न खचणारा
आयुष्यभर साथ देणारा
तो एक बाप असतो
घराची सावली होऊन
भक्कम आधार देणारा
मायच्या हाकेत होकार भरणारा
तो एक बाप असतो
तो एक बाप असतो
